*कोंकण एक्सप्रेस*
*वर्सोवा कोळीवाडा येथे राबविण्यात आलेला स्वच्छता अभियानात मंत्र नितेश राणे यांनी घेतला सहभाग*
*मुंबई*
आज दि.२० सप्टेंबर 2025 रोजी वर्सोवा कोळीवाडा येथे राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात मंत्री नितेश राणे यांनी सहभाग घेतला. या मोहिमेत स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि मच्छीमार बांधवांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. सर्वांनी मनापासून स्वीकारले की “माझा समुद्र स्वच्छ ठेवणे ही फक्त माझी जबाबदारी नाही, तर माझे कर्तव्य आहे.” स्वच्छतेच्या वेळी सर्वांनी शपथ घेतली की, आमचा कोळीवाडा यापुढे “स्वच्छता मुक्त कोळीवाडा” म्हणून ओळखला जाईल.
चला, आपण सर्व मिळून निसर्गाचे रक्षण करूया आणि समुद्र स्वच्छ ठेवण्याची कर्तव्य जाणून पाळूया.


