*कोंकण एक्सप्रेस*
*सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी बांदा पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
बांदा पोलीस ठाण्यात 25 जून 2025 रोजी दुपारी सहाय्यक पोलीस निरीक्षक *श्री.गजेंद्र पालवे साहेब* यांनी कार्यभार स्वीकारला.बांदा पोलीस निरीक्षक *श्री.विकास बडवे साहेब* यांची सिंधुदुर्ग जिल्हा विशेष शाखा ओरोस *( सिंधुदुर्गनगरी )* येथे बदली करण्यात आली. *श्री.पालवे साहेब* यांचे *श्री.बडवे साहेब* यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
निरीक्षक *श्री.विकास बडवे साहेब* यांनी दीड वर्षे बांदा पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला.आपल्या सेवा काळात त्यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेत. सहाय्य्क पोलीस निरीक्षक *श्री.गजेंद्र पालवे साहेब* हे दीड वर्षे कुडाळ पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
*पालवे साहेब* यांनी बांदा पोलीस ठाण्याचा कार्यभार हाती घेतला.यावेळी त्यांचे पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वागत केले तर *बडवे साहेब* यांना निरोप देण्यात आला.यावेळी बांदा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक *श्री.शिवराज झांजुर्णे साहेब* यांच्यासह सर्व *पोलीस कर्मचारी* उपस्थित होते.