*रक्तदान शिबिराला महिला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

*रक्तदान शिबिराला महिला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

*कोंकण एक्सप्रेस*

*रक्तदान शिबिराला महिला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

‘रक्तदान हे श्रेष्ठ दान!‘ या सामाजिक मंत्राला अनुसरून तुळस येथे पार पडलेले रक्तदान शिबिर अतिशय यशस्वी ठरले. वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्यावतीने आणि वेंगुर्ला तालुका पत्रकार समिती व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला रक्तदात्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात एकूण ४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये महिला रक्तदात्यांची संख्या विशेष उल्लेखनीय ठरली.

शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, पत्रकार समितीचे अध्यक्ष दीपेश परब, शिदे सेनेचे तालुकाध्यक्ष नितीन मांजरेकर, तुळस उपसरपंच सचिन नाईक, वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, सामाजिक नीलेश नागवेकर, जेष्ठ पत्रकार पदीप सावंत, पत्रकार योगेश तांडेल, पत्रकार दाजी तांडेल, पत्रकार महेंद्र मातोंडकर, संजय पिळणकर, सिंधु रक्तमित्रचे तालुकाध्यक्ष आबा चिपकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.चव्हाण आदी उपस्थित होते.

सर्पमित्र महेश राऊळ यांनी अवयव दानाचा संकल्प केला तर जयप्रकाश चमणकर यांनी नेत्रदान संकल्प करून तसे फॉर्म प्रकाश तेंडोलकर यांच्याकडे सुपूर्द केले. रक्तदात्यांना संस्था व आयोजकांकडून प्रमाणपत्र आणि रोप देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महेश राऊळ, माधव तुळसकर, नाना राऊळ, रोहन राऊळ, यशवंत राऊळ, प्रदीप परूळकर, भक्ती भणगे, प्रसाद भणगे, प्रज्वल परूळकर, वैष्णवी परूळकर, रोहित गडेकर, भूमी परूळकर, विधी नाईक, हेमलता राऊळ, सद्गुरू सावंत, प्रमोद तांबोसकर, नाना सावळ, राजेश पेडणेकर, श्रीकृष्ण कोंडसकर, भूषण मांजरेकर, प्रसाद नाईक, सदन वराडकर यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव प्रा.डॉ.सचिन परूळकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!