*कोंकण एक्सप्रेस*
*शिवपुतळा जवळील जमीन खचल्याने शिवभक्तांच्या भावना दुखावल्या*
*मालवण 16 जून (प्रतिनिधी)-प्रथमेश गुरव*
राजकोट येथील शिवपुतळा जवळील जमीन खचल्याने त्या ठिकाणी पुन्हा भविष्यात कोणताही अपघात होण्याची भीती निर्माण होऊ शकते . शिवपुतळा जवळील जमीन खचल्याने शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असून संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कामात अनियमितता आणल्याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी जिल्हा युवक माजी अध्यक्ष देवानंद लुडबे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण यांच्याकडे केली आहे.
जिल्हा युवक माजी अध्यक्ष देवानंद लुडबे, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, जिल्हा युवक सचिव योगेश्वर कुर्ले, पराग माणगावकर व इतर पदाधिकारी व शिवप्रेमी नागरिक यांनी यासंदर्भात निवेदन सादर केले आहे.
दोन वर्षापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी उदघाटन केलेला मेढा राजकोट येथील शिवरायांचा पुतळा कोसळला. त्याठिकाणी जवळ जवळ पुन्हा चाळीस कोटीचा निधी वापरत सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पुतळा उभारला व याचे उदघाटन महिन्याभरापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्री यांनी केले.
पुतळा उभारण्याच्या कामासाठी भरपूर जास्तीचा निधी देऊन जगविख्यात पुतळा निर्माता तसेच शासनाचे इंजिनियर, अधिकारी नेमण्यात आले तरीही या कामात हलगर्जीपणा दिसून आला आहे.
या ठेकेदार व अधिकारी यांनी घाईघाईत तब्बल दोन ते तीन महिण्यात हा साठ फुटी पुतळा उभारला .हा पुतळा उभारताना जवळ असलेल्या समुद्राच्या लाटाच्या माऱ्याचा अभ्यास करणे व इथे पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा मार्ग ठेवणे गरजेचे होते .असे असतानाही समुद्राच्या अतिउच्चतम लाटेच्या जवळ भागात हा पुतळा उभारला असून
पुतळ्या खालील बांधकाम व त्याजवळील बांधकाम हे योग्य दृष्ट्या होणे गरजेचे असताना फक्त अतिघाई अन कामात अनियमितता ठेवत हा पुतळा उभारण्यासाठी घाई केली वं योग्य रित्या तेथील खोदाई केलेली जागा नं बुजावता पुन्हा एकदा जनतेच्या भावना दुखावण्याचा काम या ठेकेदार व अधिकारी यांनी केले आहे.
यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असून संबंधित ठेकेदार वं अधिकारी यावर कामात अनियमितता आणल्या प्रकरणी कारवाई करावी .अशी मागणी केली
यावेळी त्यांनी संबंधित उपस्थित कर्मचारी यांस पुतळा असलेल्या जागी नेऊन त्याठिकाणच्या कामातील चुकीच्या बाबी दाखवल्या .सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करत
मेढा राजकोट येथील सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी – मालवण यांची भेट घेतली असून निवेदन दिले आहे.