*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेना उबाठा पक्ष विविध समस्या बाबत शासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणार – दोडामार्ग बैठकीत एकमताने निर्णय*
*दोडामार्ग /दिं१३*
सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी सक्षम नेतृत्व दया, विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी नेतृत्व पुढे येत नसल्यामुळे संघटना वाढीसाठी अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. पूर्वीप्रमाणे संघटनेचे कार्यक्रम राबविण्यात यावे. विधानसभा व लोकसभा निवडणुकी नंतर संघटना वाढीला खीळ बसली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका लढविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पाठिंशी खंबीर उभे, अशा अनेक मागण्या उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सावंतवाडी विधानसभा प्रमुख कालिदास कांदळगांवकर यांच्या कडे मांडल्या. दोडामार्ग शिवसेनेची विशेष मासिक बैठक येथील महाराजा सभागृहात संपन्न झाली.
यावेळी विधानसभा संपर्क प्रमुख कालिदास कांदळगांवकर, तालुका प्रमुख संजय गवस, महिला उपजिल्हा प्रमुख विनिता घाडी, युवासेना तालुका प्रमुख मदन राणे, तालुका संघटक लक्ष्मण आयनोडकर, महिला तालुका संघटक श्रेयाली गवस, महिला तालुका संपर्कप्रमुख अर्चना नाईक, उपजिल्हा संघटक विजय जाधव, शिवदूत अशोक परब, उपतालुका प्रमुख मिलिंद नाईक व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी तालुक्यात असलेल्या विविध समस्या बाबत शासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणे एकमताने ठरविण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.