*कोंकण एक्सप्रेस*
*कालव्याच्या बाजुला संरक्षण कठडा न उभारल्यास, भरपावसात कालव्यावर उपोषण छेडणार :जेनिफर मार्शल लोबो*
*दोडामार्ग/शुभम गवस*
साटेली भेडशी (भोमवाडी) येथील कालव्याच्या बाजुला संरक्षण कठडा उभारण्यासाठी मा.ग्रा.सदस्य साटेली-भेडशी जेनिफर मार्शल लोबो यांनी मा. तहसिलदार साहेब, तहसिल कार्यालय दोडामार्ग,
सिंधुदुर्ग बाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग,
चराठे-सावंतवाडी आणि
मा. पोलिस निरिक्षक साहेब, पोलिस ठाणे दोडामार्ग
येथे लेखी निवेदन दिले आहे.
कालव्या नजदिकच्या राहणाऱ्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. रस्ता करून देणार अशी खोटी आश्वासणे दिली जातात मुले पावसात पडून जखमी झाली आहेत, गाडीचे नुकसान झाले आहे. असे वारंवार निवेदनात सांगून कोणी दखल घेत नाही माणुसकी नाही राहिली याचे दुःख आहे ,असा हि प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सदरचे काम ठेकेदाराने अदयापपर्यंत केलेले नाही सद्या कालव्यावर चिखल साचलेला आहे. त्यामुळे गाडया स्लीप होवुन कालव्यात पडण्याची भिती आहे. या कारणास्तव, सदर ठेकेदाराला तात्काळ काम करण्याचे आदेश द्यावेत तसेच हे काम येत्या चार दिवसात न केल्यास दि. १६ जुन २०२५ रोजी भरपावसात कालव्यावर उपोषण छेडणार आहे. असा इशारा दिला आहे.