कणकवलीचे माजी मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचे दुःखद निधन

कणकवलीचे माजी मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचे दुःखद निधन

*कोकण Express*

*कणकवलीचे माजी मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचे दुःखद निधन*

*कणकवली ः प्रतिनिधी* 

कणकवली नगरपंचायतीचे माजी मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचे सोमवार 29 मार्च रोजी निधन झाले. श्री पिंपळे हे सध्या डहाणू नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदी त्यांनी दोन वेळा यशस्वी कार्यभार सांभाळला. कणकवली येथून त्यांची डहाणू येथे बदली झाली होती. दोन वर्षापूर्वी झालेल्या कणकवली नगरपंचायत महोत्सवात नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासोबत महोत्सव यशस्वी करण्यात त्यांचा हातभार राहिला होता. त्यांच्या छोट्या मुलीनेही महोत्सवातील किड्स फॅशन शो मध्ये सहभाग घेतला होता.
काही दिवसापूर्वी त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!