*शेअर मार्केट फसवणूक प्रकरणातील महिलेला न्यायालयीन कोठडी*

*शेअर मार्केट फसवणूक प्रकरणातील महिलेला न्यायालयीन कोठडी*

*कोंकण एक्सप्रेस*

*शेअर मार्केट फसवणूक प्रकरणातील महिलेला न्यायालयीन कोठडी*

*कणकवली :प्रतिनिधि*

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून कणकवली येथील एका व्यक्तीची ७ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी विनया स्वप्नील बेळेकर (४१, रा. कोकिसरे, खांबलवाडी) हिला गुरुवारी अटक केली होती. तिच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने तिला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. याप्रकरणी कणकवली येथील सर्वेश भिसे यांनी पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार विनया हिचा पती स्वप्नील शांताराम बेळेकर (४१, रा. कोकिसरे, खांबलवाडी) याला पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ व पथकाने वैभववाडी येथून ४ एप्रिल रोजी अटक केली होती. त्याला याप्रकरणी जामीन मिळाला आहे, तर त्याची पत्नी विनया हिला अटक करण्यात आली होती. मंगळवारी तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तिला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!