*रेडकर हॉस्पिटल येथे सांधे, मणके व हाडांच्या आजारांसाठी मोफत तपासणी शिबीर*

*रेडकर हॉस्पिटल येथे सांधे, मणके व हाडांच्या आजारांसाठी मोफत तपासणी शिबीर*

*कोंकण एक्सप्रेस*

*रेडकर हॉस्पिटल येथे सांधे, मणके व हाडांच्या आजारांसाठी मोफत तपासणी शिबीर*

*मालवण (प्रतिनिधी)*

मालवण येथील रेडकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर तर्फे सांधे, मणके व हाडांच्या आजारांसाठी मोफत तपासणी शिबीर दि. २३ मे रोजी सकाळी १० ते संध्याकाळी दुपारी २ वा. या कालावधीत रेडकर हॉस्पिटल, मालवण येथे आयोजित करण्यात आले आहे.

या आरोग्य शिबिरात अस्थिरोग तज्ञाकडून मोफत तपासणी केली जाईल. शिबिरातील वैद्यकीय तज्ञ हे ऑर्थोपेडिक सर्जन स्पोर्ट्स इंजुरी स्पेशालिस्ट आहेत. तसेच arthroscopy (दुर्बीणी द्वारे) शस्त्रक्रिया करण्यात निपुण असून ते रेडकर हॉस्पिटल, मालवण येथे रुग्णतपासणी व शस्त्रक्रिया करण्यासाठी उपलब्ध रहाणार आहेत.

या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, हाडांची घनता तपासणी (Bone mineral density-BMD),रक्तातील साखर (RBSL), ECG (कार्डिओग्राम), एक्स-रे आवश्यक असल्यास त्यासाठी शिबिराअंतर्गत X ray- ५०% सवलत, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलत, तज्ञ फिजिओथेरपिस्टकडून फिजिओथेरपीबाबत मोफत सल्ला आदी सेवेचा मोफत लाभ घेता येणार आहे. रुग्ण नोंदणीसाठी ०२३६५-२५२११५ व ७५८८५४४७०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!