*वेंगुर्ला तालुक्याचा निकाल ९९.८३ टक्के*

*वेंगुर्ला तालुक्याचा निकाल ९९.८३ टक्के*

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ला तालुक्याचा निकाल ९९.८३ टक्के*

*बॅ.खर्डेकर कॉलेजचा अथर्व जाधव तालुक्यात प्रथम*

*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)-*

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेला वेंगुर्ले तालुक्यातून शिरोडा व वेंगुर्ले केंद्रातून एकूण ६२१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, पैकी ६२० उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल ९९.८३ टक्के लागला आहे. वेंगुर्ले तालुक्यातून बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा अथर्व अतुल जाधव याने ९४.५० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला.

वेंगुर्ले तालुक्यातून शिरोडा केंद्रावर बा.म.गोगटे कनिष्ठ महाविद्यालय शिरोडा व वेंगुर्ले केंद्रावरून बॅ. खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले, रा.सी.रेगे ज्युनियर कॉलेज व वेतोरे येथील कै.गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरे या चार कॉलेजमधून ६२१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ६२० उत्तीर्ण होऊन निकाल ९९.८३ टक्के लागला आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील पहिले दहा मानकरी
१) अथर्व जाधव (९४.५०) बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय
२) दिया धुरी (९३.१७ टक्के) बा.म.गोगटे ज्युनियर कॉलेज शिरोडा
३) ओंकार म्हारव (९१.५० टक्के)  रा.कृ.पाटकर हायस्कूल आणि रा.सी.रेगे ज्युनियर कॉलेज
४) राधिका तेरेसे (९०.५०)  बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय
५) विराज प्रभुसाळगावकर (९०.१७) बा.म.गोगटे ज्युनियर कॉलेज शिरोडा
६) वैष्णवी सावंत (८९.५०) बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय
७) मिताली सातजी (८७.८३) बा.म. गोगटे ज्युनियर कॉलेज शिरोडा
८) स्नेहा गावडे (८६.८३) बा.म. गोगटे ज्युनियर कॉलेज शिरोडा
९) गायत्री मांजरेकर (८४.५०)श्री देवी सातेरी हायस्कूल व
   कै.गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय
१०) महिमा केळुसकर (८३.५०)बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय
खर्डेकर महाविद्यालयाचा निकाल ९९.५८ टक्के
येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या सायन्स, कॉमर्स, कला व किमान कौशल्य या चार विभागातून मिळून एकूण २३९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील २३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. महाविद्यालयाचा निकाल ९९.५८ टक्के एवढा लागला आहे.
विज्ञान शाखा ः १२८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. निकाल १०० टक्के लागला.
अथर्व अतुल जाधव हा ५६७ गुण मिळवून कॉलेजसह तालुक्यात प्रथम, राधिका गणपत तेरसे ही ५४३ गुण मिळवून द्वितीय तर वैष्णवी सुबोध सावंत हिने ५३७ गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
कॉमर्स शाखा ः एकूण ४६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. निकाल १०० टक्के लागला. महिमा आनंद केळुसकर ही ५०१ गुण मिळवून प्रथम, सुयश विठ्ठल सोकटे हा ४९३ गुण मिळवून द्वितीय, तर मयुरेश सखाराम सौदागर हा ४७९  गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
कला शाखा ः एकूण ४३ विद्यार्थी परिक्षेस बसले होते, त्यातील ४२ उत्तीर्ण झाले. निकाल ९७.६७ टक्के एवढा लागला. तन्वी संजय खानोलकर हिने ४४८ गुण मिळवून प्रथम, यशश्री संजय पराडकर हिने ४२७ गुण मिळवून द्वितीय तर केतन हेमंतकुमार परब याने ४१८ गुणव मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
किमान कौशल्य शाखा ः २२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. निकाल १०० टक्के लागला. या शाखेतून सिद्धी गोविद परूळेकर हिने ४५३  गुण मिळवून प्रथम, तेजस बाबुराव सावंत याने ४४६ गुण मिळवून द्वितीय तर स्वप्निल अनंत धर्णे याने ४३९ गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
रा. सी. रेगे ज्युनियर कॉलेजचा निकाल १०० टक्के
रा. कृ. पाटकर हायस्कूलच्या कला, वाणिज्य व किमान कौशल्य या तीन विभागातून एकूण ४८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे.
वाणिज्य शाखा ः एकूण २९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. निकाल १०० टक्के लागला. ओंकार शामसुंदर म्हारव याने ५४९ गुण मिळवून प्रथम, धनश्री मिलिद निकम हिने ५०० गुण मिळवून द्वितीय, तर साध्वी अनंत मिडे हिने ४४० गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
कला शाखा ः एकूण ७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. शाखेचा निकाल १०० टक्के लागला. पारस प्रसाद केरकर याने ३२३ गुण मिळवून प्रथम, फारूख महम्मद हुसेन नदाफ याने ३१५ गुण मिळवून द्वितीय, तर अरमान असद मकानदार याने ३०७ गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
किमान कौशल्य शाखा ः १२ विद्यार्थी परिक्षेस बसले होते. निकाल १०० टक्के लागला. जान्हवी दिलीप बांदवलकर हिने ४८३ गुण मिळवून प्रथम, पराग प्रदिप कांबळी याने ४६७ गुण मिळवून द्वितीय, तर नारायण राजन मुणगेकर याने ४६४ गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
बा. म. गोगटे कनिष्ठ महाविद्यालय शिरोडाचा १०० टक्के निकाल
बा. म. गोगटे कनिष्ट महाविद्यालय शिरोडामधून एकूण २३९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. निकाल १०० टक्के लागला आहे.
विज्ञान शाखा ः ९३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. शाखेचा निकाल १०० टक्के लागला. नारायण प्रशांत भानजी याने ७८.६८ टक्के गुण मिळवून प्रथम, पार्थ त्रिबक केरकर व काजल सुनिल मुळीक यांनी ७८.१७ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर युक्ता हनुमंत तांडेल हिने ७७.८३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
वाणिज्य शाखा ः ५३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. शाखेचा निकाल १०० टक्के लागला. दिया महादेव धुरी हिने ९३.१७ टक्के गुण मिळवून प्रथम, विराज अनंत प्रभूसाळगांवकर याने ९०.१७ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर मिताली महेंद्र सातजी हिने ८७.८३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
कला शाखा ः ४१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. शाखेचा निकाल १०० टक्के लागला. स्नेहा धोंडु गावडे हिने ८६.८३ टक्के गुण मिळवून प्रथम, ऋचिका विष्णू केरकर हिने ८३ टक्के गुण मिळवून द्वितीय व रूपेश रामचंद्र पांढरे याने ६५.८३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
किमान कौशल्य शाखा ः ५२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. निकाल १०० टक्के लागला. रविना कुमार पवार हिने ८१.६७ टक्के गुण मिळवून प्रथम, अक्षय उदय कावळे याने ७९.१७ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर तनुजा भगवान नाईक हिने ७८.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
कै. गुलाबताई नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरेचा निकाल १०० टक्के
श्री देवी सातेरी हायस्कूल तथा कै. गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरे या विद्यालयातून एकूण ९५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. निकाल १०० टक्के एवढा लागला आहे.
विज्ञान शाखा ः ४६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. शाखेचा निकाल १०० टक्के लागला. गायश्री गुरूनाथ मांजरेकर हिने ५०७ गुण मिळवून प्रथम, ईशा राघोबा ठाकूर हिने ४६० गुण मिळवून द्वितीय तर संजना सत्यवान दाभोलकर हिने ४५६ गुण मिळवूत तृतीय क्रमांक मिळविला.
वाणिज्य शाखा ः २९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. सर्व उत्तीर्ण झाले. निकाल १०० टक्के लागला.  रसिका मंगेश ठाकूर हिने ४८५ गुण मिळवून प्रथम, अनुष्का देविदास वेंगुर्लेकर हिने ४८१ गुण मिळवून द्वितीय, तर दिप्ती दिगंबर परब हिने ४६२ गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
कला शाखा ः २० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. निकाल १०० टक्के लागला. भैरवी सिताराम मयेकर हिने ४१६ गुण मिळवून प्रथम, रोहित महेश राऊळ याने ३९४ गुण मिळवून द्वितीय तर वैष्णव सूर्यकांत तुळसकर याने ३६४ गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!