*कोंकण एक्सप्रेस*
*तुळस येथे ४ रोजी आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आणि तुळस श्री देवी सातेरी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, सीपीएए मुंबई व व्हिजन हॉस्पिटल गोवा यांच्या सहकार्याने ४ मे रोजी सकाळी ८.३० ते सायं. ४ पर्यंत उत्सव मंगल कार्यालय, तुळस येथे मोफत महाआरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात सीपीएए मुंबईचे तज्ज्ञ डॉक्टर जनरल सर्जरी, तोंडाच्या पोकळीची दृश्य तपासणी, डोके, मान, कान, नाक, घसा, तोंडाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग यासारख्या आजारांची तपासणी करण्यात येईल. तसेच फिजीशियन तपासणी, प्राथमिक रक्त तपासणी, पॅप स्मियर चाचणी आणि पूर्ण शारीरिक तपासणी केली जाणार आहे. गरज असल्यास रेडिओलॉजिकल तपासणाही विनामूल्य केली जाईल. याशिवाय, व्हिजन हॉस्पिटल गोवा यांच्यावतीने नेत्र रोगतज्ज्ञांमार्फत डोळ्यांच्या आजारांची तपासणी केली जाणार आहे. तपासणी करण्यासाठी डॉ. सतीश काणेकर, डॉ. संजय घिल्डीयाल, डॉ.वीणा बोरकर, डॉ.रचना मेहरा, वेंकटेश करी, शाहजहान शेख, तेजस्वी बिचोलकर, करिश्मा कुंभार-जुवेकर आदी तसेच सीपीएए संस्थेच्या कार्यकारी संचालक निता मोरे आणि सहसंचालिका मीनल परब या उपस्थित राहणार आहेत. नावनोंदणीसाठी विवेक तिरोडकर (७७७५८२८५८८) किवा सुजाता पडवळ (९४२१२६८२३९) यांच्याशी संफ साधावा.