*राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरव रथयात्रेचा किल्ले सिंधुदुर्गवरून शुभारंभ*

*राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरव रथयात्रेचा किल्ले सिंधुदुर्गवरून शुभारंभ*

*कोंकण एक्सप्रेस*

*राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरव रथयात्रेचा किल्ले सिंधुदुर्गवरून शुभारंभ*

*मालवण (प्रतिनिधी)*

राज्यातील विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या गडकिल्ल्यांच्या रक्षणार्थ राष्ट्रवादी काँग प्रेस कटिबद्ध असून त्यासाठी काढण्यात आलेल्या गौरव रथाचा शुभारंम मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग येथील माती, पाणी आणि फुले एकत्रित घेऊन करण्यात आला आहे. आम्ही उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या नेतृत्वाखाली कोकण विभागातील सर्व गडकिल्ले आणि ऐतिहासिक मंदिरांमध्ये पोहचणार आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले.

६५ व्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील गड किल्ले, ऐतिहासिक नद्या, ऐतिहासिक मंदिरे यांची माती, पाणी, पुष्प यांचे एकत्रिकरण करुण महाराष्ट्र हा एकजूट असल्याचे दाखवून देण्यात येणार आहे. यानिमित्त आज सिंधुदुर्ग किल्ला येथे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मातीचे संकलन करुन मालवण जेटी येथे या कलशाचे पूजन रविवारी सायंकाळी करण्यात आले. सिंधुदुर्गची जबाबदारी राष्ट्रवादीचे कोकणेचे नेते बाप्पाजी सावंत यांच्याकडे असल्याने त्यांच्याच हस्ते माती अर्पण करण्यात आली. यानंतर पेहेलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्यामध्ये मृत पावलेल्या पर्यटकांप्रती श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत झाले. नंतर रथामधील कलशामध्ये माती, पुष्प व पाणी ठेवण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस बाप्पा सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, प्रदेश चिटणीस एम. के गावडे, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, प्रांतिक सदस्य विलास गावकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, संदीप राणे, शहर अध्यक्ष इम्रान शेख, उपाध्यक्ष गणेश चौगुले, युवक तालुकाध्यक्ष निशिकांत कडुलकर, सचिन अडुळकर, केदार खोत, सुनील उर्फ बाळू मेस्त्री, राष्ट्रवादी मालवण तालुका अध्यक्ष नाथ मालोंडकर, कुडाळ तालुकाध्यक्ष आर.के. सावंत, कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, वैभववाडी तालुका अध्यक्ष वैभव रावराणे, देवगड तालुका अध्यक्ष

रशीद खान, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर, ओबीसी जिल्हा अध्यक्ष सर्वेश पावास्कर, तालुका उपाध्यक्ष विराज भालेकर, बंटी परब, कणकवली महिला तालुका अध्यक्षा स्नेहल पाताडे, जिल्हा सचिव सतीश पाताडे, वैभववाडी महिला तालुका अध्यक्ष श्रेया मुद्रस, रमेश मोपेलकर, शशी मुद्रस, मोहन लसने, साईद काझी, मुश्ताक काझी, हनिफ काझी, नजीर शेख, जिल्हा सचिव सुशील चमनकर, महिला तलुकाध्य वेंगुर्ला ऋतुजा शेटकर, शहर अध्यक्ष सूरज परब, वर्धा परब, वेंगुर्ला तालुका सरचिटणीस संदीप सातार्डेकर, वेंगुर्ला उपाध्यक्ष सचिन पेडणेकर, संतोष राऊळ, दोडामार्ग तालुका उपाध्यक्ष मेगेंद्र देसाई, दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष साबाजी सावंत, जिल्हा उपाध्यक्ष एम. डी. सावंत, कामगार सेल जिल्हा अध्यक्ष प्रभाकर गावकर आदी उपस्थित होते.

रथयात्रा मुंबईत १ मे ला पोहचणार

राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुधीर तटकरे यांच्या संकल्पनेतून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ कोकण, मराठवाडा या चार विभागांमध्ये गौरव रथ यात्रा काढण्यात येत आहे. ही रथ यात्रा १ मे रोजी ६५ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत पोहचणार आहे. या चारही विभागांमध्ये गौरव रथ ज्यामध्ये ऐतिहासिक गडकिल्ले, ऐतिहासिक नद्या, ऐतिहासिक देवळे यांची माती, पाणी व फुले यांचा संग्रह करून १ मे रोजी मुबई येथील हुतात्मा स्मारक येथे घेऊन जाऊन त्याठिकाणी प्रमुख कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर ६५ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने वरळी येथील दांभोळी मैदान येथे १ ते ४ मे या कालावधीमध्ये कार्यक्रम होणार आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोकण विभागाचा रथ आला आहे या रथामध्ये मंगलमृदा कलश व मंगलजल कलश हे दोन कलश आहेत. सिंधुदुर्ग किल्ला येथील माती, कांदळगाव येथील रामेश्वर मंदिरातील पुष्प व अमृत, कर्ली नदीचे पाणी, विजयदुर्ग किल्ल्याची माती यांचे पुजन करून या कलशांमध्ये अप्रित केले आहे. हा कलश आता रत्नागिरी, रायगड, ठाणे या भागात जाणार आहे, असेही श्री. नाईक म्हणाले.

किल्ल्यावरील जेटीची दुरूस्ती करणार – नाईक

येणाऱ्या काळामध्ये गड किल्ल्यांसाठी लागणारी जी काही मदत असेल ती – करण्यात येईल. सिंधुदुर्ग किल्ला येथे आज भेट दिली असता तेथील पुजारी यांनी – किल्ल्यावर जाण्यासाठी जी जेटी आहे ती नादुरुस्त झाल्याने ते भक्कम करण्यासाठी मागणी केली आहे ती मागणी आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून येणाऱ्या वर्षात पूर्ण करणार असल्याचे आश्वासन अबिद नाईक यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!