कणकवली येथील शिक्षिका प्रतिभा कोतवाल यांच्या ‘ रानभाजांच्या चविष्ट पाककृती’ पुस्तकाचे प्रकाशन

कणकवली येथील शिक्षिका प्रतिभा कोतवाल यांच्या ‘ रानभाजांच्या चविष्ट पाककृती’ पुस्तकाचे प्रकाशन

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली येथील शिक्षिका प्रतिभा कोतवाल यांच्या ‘ रानभाजांच्या चविष्ट पाककृती’ पुस्तकाचे प्रकाशन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवलीच्या ज्येष्ठ सदस्या आणि कणकवली शाळा क्र. ३ च्या शिक्षिका श्रीमती प्रतिभा खंडेराव कोतवाल यांच्या ‘रानभाज्यांच्या चविष्ट पाककृती’ या माहितीपूर्ण पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज कणकवली येथे उत्साहात पार पडला.
कणकवली केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. के. एम. पवार यांच्या शुभहस्ते आणि कणकवली केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोतवाल मॅडम यांनी आपल्या पुस्तकात रानभाज्यांच्या अनेक पारंपरिक आणि चविष्ट पाककृतींचा समावेश केला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून रानभाज्यांचे महत्त्व आणि त्यांची पौष्टिक मूल्ये जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा उद्देश आहे.
या प्रकाशन सोहळ्यादरम्यान केंद्रप्रमुख श्री. पवार यांनी कोतवाल मॅडम यांच्या कार्याचे कौतुक केले आणि हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, उपस्थित मुख्याध्यापकांनीही कोतवाल मॅडम यांना त्यांच्या या साहित्यिक प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या.
‘रानभाज्यांच्या चविष्ट पाककृती’ हे पुस्तक वाचकांना रानभाज्यांच्या विविधतेची आणि त्यांच्या आरोग्यदायी गुणांची माहिती देईल. तसेच, या भाज्यांचा आहारात समावेश कसा करावा, याबद्दल मार्गदर्शन करेल.
प्रतिभा कोतवाल मॅडम यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!