*कोंकण एक्सप्रेस*
*बावशी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिराचा 29 एप्रिलला जीर्णोद्धार*
*कणकवली : प्रतिनिधि*
बावशी – शेळीचीवाडी येथील श्री ब्राम्हणदेव मंदिराच्या जिर्णोद्धार सोहळ्यानिमित्त २९ एप्रिल ते १ मे या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने २९ एप्रिलला सकाळी ७.३० वा. श्री गणेश पुजन, स्वस्ती पुण्यवाचन, प्रसाद शुध्दी, प्रसाद वास्तुमंडल, ब्रम्हादीमंडल, नवग्रह मंडळ, देवता स्थापन मुख्य देवता श्री ब्राम्हणदेव जलाधीवास, अभिषेक, देवता शय्याधीवास, हवन व इतर धार्मिक कार्यक्रम, दुपारी १.३० वा. महाप्रसाद, सायं. ७ वा. स्थानिक भजने
३० एप्रिलला सकाळी ७.३० वा. श्री ब्राम्हणदेव प्राणप्रतिष्ठापना, कळस पूजन आणि कलशारोहन, सकाळी ९ वा. तत्त्वत्न्त्यास, तत्त्वहोम, पुर्णाहुती, आरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ५ वा. महिलांसाठी होममिनिस्टर (फणी गेम्स आणि इतर कार्यक्रम), रात्री ९ वा. लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम.
१ मेला सकाळी ९ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वा. महाआरती, दुपारी ३.३० बाः महिलांसाठी हळदी कुंकू, सायं. ४ वा. सुस्वर भजने, सायं. ७ वा. मंदिर प्रदक्षिणा दिंडी, रात्री १० वा. मान्यवरांचे सत्कार व आभार प्रदर्शन, रात्री १०.३० वा. देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ चेंदवण यांचा पातिव्रत्यतेज ट्रीकसीनयुक्त महापौराणिक नाट्यप्रयोग, असे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन बावशी श्री ब्राम्हणदेव प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष वामन रांबाडे व सचिव सुरेश रांबाडे यांनी केले आहे.