*कोंकण एक्सप्रेस*
*दोन लहान मुलांसह आईची आत्महत्या*
*देवगड तालुक्यातील तिर्लोट-आंबेरी येथील घटनेने खळबळ*
*प्रशांत वाडेकर, देवगड*
देवगड तालुक्यातील तिर्लोट-आंबेरी पुलावरून उडी घेत एका २४ वर्षीय महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सौ. श्रिया सुरज भाबल (वय २४) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून कु. श्रेयस भाबल (वय ५) आणि दुर्वेश भाबल (वय ४) अशी लहान मुलांची नावे आहेत. सौ. श्रिया व कु. श्रेयस यांचा मृतदेह सापडला असून दुर्वेशचा मृतदेह सापडला नव्हता.
याबाबत विजयदुर्ग पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. श्रिया या तिर्लोट-आंबेरी येथील रहिवासी होत्या. त्यांचे पती सुरज भाबल हे मुंबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. श्रिया आपल्या सासू-सासऱ्यांसोबत तिर्लोट-आंबेरी येथे राहत होती. १५ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता श्रिया आपल्या दोन मुलांसह घरातून निघून गेली होती. रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरुवात केली.
१६ एप्रिल रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास श्रिया यांचा मृतदेह आंबेरी पुलाजवळ आढळून आला. तर श्रेयस या पाच वर्षीय मुलाचा मृतदेह पिराचे पोय या ठिकाणी सापडला. मात्र दुर्वेश हा चार वर्षीय बालक अद्यापही बेपत्ता असून त्याचा शोध सुरु आहे. या शोध मोहिमेमध्ये तिर्लोट आंबेरी गावातील ग्रामस्थांसह विजयदुर्ग पोलीस घेत आहेत. पोलीस ठाण्याचे एस. बी पडेलकर, पी.पी जाधव, व्ही.एस पडवळ, पी.एस गावडे, पी.डी कांबळे, बी. एल कांदे आदी पोलीस कर्मचारी यांनी देवगड ग्रामीण रुग्णालय येथे दाखल झाले आहेत. असून मृत्यूचे कारण अद्यापही समजू शकले नाही या घटनेमुळे तिर्लोट आंबेरी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.