*कोकण Express*
*सावंतवाडीच्या पर्यटनवाढीसाठी समन्वयाने काम करण्यास कटिबद्ध; नगराध्यक्ष संजू परब यांची ग्वाही*
पक्षीय पादत्राणे बाजूला ठेवून सावंतवाडीचा पर्यटनद्रष्ट्या विकास करणे याला माझी प्राथमिकता असून सावंतवाडीतील सामाजिक संस्था, सेवाभावी व्यक्ती आणि विशेषतः पर्यटन आणि पर्यावरणात तळमळीने काम करणाऱ्या संस्थाशी समन्वय व संवाद ठेवून हे शहर सुंदरवाडी या नावांप्रमाणेच सुंदर करण्याचा माझा संकल्प असून सिंधुदुर्ग जिल्हा व्यवसायिक पर्यटन महासंघाच्या समन्वयाने काम करु.असे आश्वासन सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी दिले.
पर्यटन व्यवसायिक महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पाटणकर, जिल्हा सचिव ॲड. नकुल पार्सेकर व सावंतवाडी पर्यटन महासंघाचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पंडीत यांनी नगराध्यक्ष संजू परब यांची भेट घेऊन सावंतवाडी शहराच्या पर्यटन वाढीबाबत आणि शहरात काही नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबाबत सविस्तर चर्चा केली.याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून सावंतवाडीत सेल्फी पाँईन्ट,नाना नानी पार्क, पक्षीनिरिक्षण केंद्र तसेच पर्यटकांच्या माहितीसाठी मार्गदर्शक फलक लावण्याबाबतही नगराध्यक्षानी सकारात्मक भूमिका घेतली असून याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.