*कोकण Express*
*सिंधुदुर्गात २१ व २२ मार्चला पाऊस पडण्याची शक्यता*
*सिंधुदुर्गनगरी ता.२०:*
प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ व २२ मार्चला तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी,असे आवाहन सिंधूदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष यांच्यावतीने करण्यात आले आहे.