*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवलीत यंगस्टार मंडळाच्या वतीने १७ एप्रिलपासून कबड्डी स्पर्धा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने यंगस्टार मित्रमंडळाच्या वतीने १७ ते २० एप्रिल या कालावधीत नगरपंचायतीच्या बॅडमिंटन कोर्ट येथे राज्यस्तरीय पुरुष निमंत्रित संघाची व जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेकरीता अनुक्रमे रोख रक्कम ५० हजार ०२९, २५हजार ०२९ व यंगस्टार चषक, ५ हजार २९, ५ हजार २९ अशी बक्षिसे आहेत. याशिवाय अष्टपैलू खेळाडू २ हजार ५२९, उत्कृष्ट पकड १ हजार ५२९, चढ़ाई १ हजार ५२९, शिस्तबद्ध संघ २ हजार ५२९ व यंगस्टार चषक, अशी वैयक्तिक स्वरुपातील बक्षीसे आहेत. जिल्हास्तरीय महिला कबड्डीसाठी अनुक्रमे रोख रक्कम ७ हजार, ५ हजार व यंगस्टार चषक अशी बक्षीसे आहेत. अष्टपैलू खेळाडू २ हजार, उत्कृष्ट पकड १ हजार, चढाई १ हजार, शिस्तबद्ध संघ १ हजार ५०० आणि यंगस्टार चषक अशी बक्षीसे आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.