पालकमंत्र्यांसह  शिवसेना नेते व पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

पालकमंत्र्यांसह  शिवसेना नेते व पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

*कोकण Express*

*पालकमंत्र्यांसह  शिवसेना नेते व पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी*

*भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री व शहराध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे*

*कणकवली ः प्रतिनिधी*

आज शनिवारी भाजप कडून  पोलिसात  निवेदन देत कारवाईची मागणी करण्यात आली कणकवलीत शिवसेना-भाजप मधील  तणाव वाढला असून   शुक्रवारी शिवसेनेकडून  भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर  खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसा दिवशी कोविड नियमांचे उल्लंघन व रात्री ​१२ वाजता नरडवे चौकात  संचार बंदी च्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी  पालकमंत्र्यांसह  शिवसेना नेते व पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी  भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री व शहराध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे यांनी कणकवली पोलिसांकडे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे १७ मार्च २०२१ रोजी शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपा आमदार नितेश राणे यांच्या विरोधात केलेले आंदोलन हे जिल्हयात जमावबंदी आदेश असताना युवा सेना जिल्हाध्यक्ष गितेश कडू व नगरसेवक कन्हैया पारकर तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सार्वजनिक ठिकाणी आमदार नितेश राणे यांच्या फोटोवर क्रॉस मारत घोषणाबाजी करून आपल्या नियमांचे उल्लंघन केले. तरी त्यांच्यावर आपल्याकडून कारवाईची कोणतीही दखल घेतली नाही . म्हणून आम्हाला आपल्या कणकवली पोलिस स्थानकात निवेदन देण्यासाठी यावे लागले. यावेळी आम्ही कोणाचा निषेध , घोषणा अथवा हुल्लडबाजी केली नाही. आमच्या कार्यकर्त्यांकडून कुठल्याही आदेशाचा भंग केला नाही. तसेच विभाग नियंत्रक , राज्य परिवहन विभाग कणकवली येथे आम्ही गेलो . गितेश कडू त्याठिकाणी नोकरीला असतात . ऑनड्युटी त्यांनी केलेले आंदोलन हे विभाग नियंत्रक यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी त्याठिकाणी कोणतीही घोषणाबाजी , निदर्शने व कोणाचा निषेध केला नाही . त्यामुळे आम्ही कोणत्याही कायद्याचा भंग केला नाही. असे असताना देखील शिवसेनेकडून आमच्या कार्यकत्यांवर गुन्हे दाखल करा असा दबाव आणत असतील तर १५ मार्च , २०२१ रोजी भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हयातील शेकडो शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य यांच्या कोव्हिड -१ ९ च्या नियमांचे आदेश धाब्यावर बसवून पालकमंत्री उदय सामंत , खासदार विनायक राऊत , सतिश सावंत संदेश पारकर , सुशांत नाईक , अतुल रावराणे , शैलेश भोगले , हर्षद गावडे , संजय पडते , संदेश पटेल रविंद्र जोगल , कन्हैया पारकर , संजय पारकर , गितेश कडू तसेच जिल्हयातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा केला . तसेच कणकवली पटवर्धन चौक कणकवली येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जाहीर केलेली संचारबंदी लागू असताना रात्री १२ वाजता खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस कन्हैया पारकर , सुजित जाधव , वैभव मालंडकर यांनी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा केला. तरी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर आपल्या खात्यामार्फत कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री व भाजपा कणकवली शहराध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे यांनी कणकवली पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!