*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्गमध्ये ‘गीत रामायण’ ऐकण्याची संधी*
*दोडामार्ग/ शुभम गवस*
दोडामार्गमध्ये ‘गीत रामायण’ ऐकण्याची संधी.पं. शेखर फणशीकर यांचे गायन, शनिवारी भोसले के. डी. कॉम्प्लेक्स येथे कार्यक्रम ..
बापूजीनी ( प. पू. श्री. सुधीर फडके ) अजरामर केलेल्या गीत रामायण मधील काही निवडक गाण्यांचा कार्यक्रम शनिवार दिनांक २९ मार्च रोजी संध्या. ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दोडामार्ग बाजारपेठेतील के. डी. कॉम्प्लेक्स येथे होणार आहे तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन भोसले के. डी. आणि अंकुर कॉम्प्लेक्स आयोजकांनी केले आहे. सदर कार्यक्रम पं. शेखर फणशीकर हे पूर्णवाद्य संचात सादर करणार आहेत.