*कोकण Express*
*विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास समाविष्ट करा……..*
*शिवप्रेमी संघटना सिंधुदुर्ग ची जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्याकडे मागणी……*
*ओरोस ः प्रतिनिधी*
धर्मवीरसंभाजी महाराजांनी देशासाठी व धर्मासाठी दिलेल्या बलिदानाची माहिती व्हावी. विद्यार्थ्यांमध्ये धर्माभिमानी व राष्ट्राभिमानी जागा व्हावा. यासाठी शालेय अभ्यासक्रमात धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदानाची माहिती देणारा धडा समाविष्ट करावा. अशी मागणी शिवप्रेमी संघटना सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.शिव प्रेमी संघटना सिंधुदुर्ग शाखा कुडाळ च्या वतीने अध्यक्ष रमाकांत नाईक यांनी आज जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांना निवेदन सादर केले.