*देवगड महाविद्यालयामध्ये वित्तीय समावेशन आणि संधी मार्गदर्शन शिबिर*

*देवगड महाविद्यालयामध्ये वित्तीय समावेशन आणि संधी मार्गदर्शन शिबिर*

*कोंकण एक्सप्रेस*

*देवगड महाविद्यालयामध्ये वित्तीय समावेशन आणि संधी मार्गदर्शन शिबिर*

*प्रशांत वाडेकर, देवगड*

श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाच्या उन्नत भारत अभियान विभाग आणि आय क्यू ए सी सेल आणि देशपांडे फाउंडेशन हुबळी यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड मधील शेतकऱ्यांसाठी वित्तीय समावेशन आणि संधी या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन देवगड महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते.
सदर शिबिरामध्ये देशपांडे फाउंडेशनचे सीईओ आनंद बारिया, श्रीमती सुहाग शिरोडकर आणि प्रमुख मार्गदर्शक राहुल घोपे यांनी शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना, वित्तीय समावेश आणि संधी याअंतर्गत विविध विमा योजना (विशेषतः शैक्षणिक कर्ज आणि मुद्रा कर्ज), विविध ठिकाणी गुंतवणूक संधी यामध्ये म्युच्युअल फंड, एसआयपी आणि बचतीबाबत सविस्तर माहिती दिली.
या शिबिरामध्ये शिक्षण विकास मंडळ, देवगडचे अध्यक्ष जनार्दन तेली, उपाध्यक्ष चंद्रकांत पाळेकर, कार्यवाह वैभव बिडये, सहकार्यवाह विश्वामित्र खडपकर, तुकाराम तेली, नियामक समिती सदस्य शैलेश महाडिक आदी मान्यवर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. या शिबिराचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक प्रा. डॉ. नितीन वळंजू यांनी केले आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शरद शेटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!