*कोटकामते ग्रामस्थांनी विकासकामातील पारदर्शकतेबाबत पुन्हा दाखविली जागरूकता*

*कोटकामते ग्रामस्थांनी विकासकामातील पारदर्शकतेबाबत पुन्हा दाखविली जागरूकता*

*कोंकण एक्सप्रेस*

*कोटकामते ग्रामस्थांनी विकासकामातील पारदर्शकतेबाबत पुन्हा दाखविली जागरूकता*

*प्रशांत वाडेकर, देवगड*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात RDSS, LR व NCRMP प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्या माध्यमातून रस्त्याच्या बाजूने उच्चदाबाची विद्युत वाहिनी जमिनीत टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, या कामात आवश्यक परवाने आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे ग्रामस्थांच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे.
कामाच्या ठिकाणी जाऊन ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराला कामाच्या स्वरूपाबाबत व आवश्यक परवान्यांबाबत विचारणा केली असता ठेकेदाराकडुन ग्रामस्थांची दिशाभुल करुन निकृष्ट दर्जाचे जबरदस्तीने काम करत ग्रामस्थांच्या जिवाशी खेळण्याचा  प्रयत्न करण्यात येत आहे.
ग्रामस्थाचा प्रमुख आक्षेप:
१.परवानग्यांचा अभाव – काम सुरू असताना आवश्यक परवाने उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.
२.सुरक्षा उपायांचा अभाव – आवश्यक सुरक्षा साधनं, रोड बॅरिगेट्स आणि इतर सुरक्षात्मक नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आले.
३.योजना आणि आराखड्याचा अभाव – विद्युत वाहिनी भूमिगत करण्याचा ठोस आराखडा आणि रोडमॅप ठेकेदाराकडे नव्हता.
४.ठेकेदार प्रतिनिधीचा अनुपस्थिती – अधिकृत प्रतिनिधी घटनास्थळी उपस्थित नव्हता.
ग्रामस्थांच्या मते, कोटकामते ते नारिग्रे हा रस्ता अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत होता. या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी अनेक आंदोलने, रास्ता रोको आणि उपोषण करत प्रशासनाला जागे केले होते. अखेर ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे हा रस्ता तयार झाला. त्यामुळेच आता पुन्हा हा रस्ता खोदण्यात येत असल्याने ग्रामस्थांना योग्य नियोजनाची खात्री करून घेण्याची गरज वाटली.
 कामासाठी आवश्यक विद्युत वाहिनी फिरविण्याचा आराखडा तसेच रोड मॅप ठेकेदाराकडे उपलब्ध नव्हता. एवढेच नव्हे तर कामाच्या ठिकाणी ठेकेदाराचा अधिकृत प्रतिनिधीही उपस्थित नव्हता. ग्रामस्थांनी सकाळी ११.०० वा  काम अडऊन आवश्यक परवाने घेऊन या मग कामाला सुरुवात करा अशी नम्र विनंती ग्रामस्थांकडुन  करण्यात आली होती  तरीपण ग्रामस्थांच्या विनंतीला न जुमाणता काम रेटुन नेण्याचा प्रयत्न करण्यात आला पुन्हा ग्रामस्थ आक्रमक होऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारणा करण्यात आली या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्र. जि. मा. १४ चे अधिकारी मा. निकाळजे साहेब यांनी संध्याकाळी ७:३० वाजता घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली व संबंधित कामासाठी आमच्या कार्यालयातुन कोणत्याही प्रकारच्या पुर्व परवानग्या घेतलेल्या नाहीत हे स्पष्ट केले. यावर ग्रामस्थ अधिक आक्रमक होऊन ठेकेदाराच्या हलगर्जीपणावर व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारावर जोरदार नाराजी व्यक्त करत संबंधित काम हे पुर्ण परवानग्या घेतल्यानंतरच तसेच कोटकामते ग्रामपंचायत ची लेखी  परवानगी घेऊनच कोटकामते – नारीग्रे रस्यावर कामाला सुरुवात करण्याची  सक्त ताकीद देण्यात आली व काम झाले की रस्ता सुस्थीतीत करुन देणे असे सांगण्यात आले यावेळी  उपसरपंच श्री. गणेश घाडी, ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रितम चव्हाण, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री.जितेंद्र मेस्त्री, श्री. प्रदीप कोकम, श्री.दिनेश राणे, श्री. विजय देवळी, श्री. सुनिल चौकेकर, बाबू कुडपकर, मनोज कोकम, वामन कोकम, सुरेश कोकम, विजय पोकम, योगेश पोकम, भुतकर सर, महेंद्र मेस्त्री, हेमंत कुडपकर, दिपक रजपूत, राजा रजपूत, मंगेश पोकम, फुलवाली आजी, जयवंती आजी यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करत ठेकेदार प्रतिनिधी राठोड यांना चांगलेच सुनावले.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, सदर काम योग्य परवानग्या आणि नियोजनानुसार व्हावे, तसेच रस्त्याच्या नुकसानभरपाईबाबत ठोस निर्णय घेण्यात यावा. प्रशासनाने याबाबत त्वरित कारवाई न केल्यास पुढील आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!