*कोंकण एक्सप्रेस*
*प. भालचंद्र महाराज संस्थानचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा १६ मार्च रोजी..*.
*न. पं. कणकवलीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील व सुरेश कामत यांची प्रमुख उपस्थिती..*
*कणकवली : प्रतिनिधि*
परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळ आयोजित जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा २८ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती. या सराव परीक्षेतील पूर्व उच्च प्राथमिक २१ व पूर्व माध्यमिक २१ अशा ४२ गुणवत्ता यादीतील विद्याथ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार दि. १६ मार्च २०२५ रोजी काशीभवन भक्तनिवास सभागृह (पहिला मजला) येथे सकाळी १०.३० ते १२-३० या वेळेत संपन्न होणार आहे. या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुरेश कामत, अध्यक्ष, परमहंस भालचंद्र महाराज संस्थान हे भूषविणार असून कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे सर्व विश्वस्थ व इतर मान्यवर यांची उपस्थिती असणार आहे. सर्व गुणवत्ता यादीतील गुणवंत विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संपर्क साधला जाणार असून या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह वेळीच कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन गजानन उपरकर, अध्यक्ष शैक्षणिक मंडळ व सर्व सहकारी आणि विजय केकुसकर व्यवस्थापक, भालचंद्र महाराज संस्थान यांनी केले आहे.