*कोंकण एक्सप्रेस*
*वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी प्रदीप रावराणे यांची बिनविरोध निवड*
*वैभववाडी प्रतिनिधी : संजय शेळखे*
वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी प्रदीप रावराणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी उपनगराध्यक्ष संजय सावंत यांनी पक्षाच्या धोरणानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली होती. उपनगराध्यक्ष पदासाठी प्रदीप रावराणे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. पिठासीन अधिकारी जगदीश काटकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी मुख्याधिकारी प्रतीक थोरात उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, माझी उपनगराध्यक्ष संजय सावंत, नगरसेविका नेहा माईणकर, नगरसेवक रणजीत तावडे, नगरसेवक रोहन रावराणे, नगरसेवक विवेक रावराणे, नगरसेवक राजन तांबे, नगरसेवक सुभाष रावराणे, नगरसेविका संगीता चव्हाण, नगरसेविका दर्शना पवार, नगरसेविका यामिनी वळवी, यांच्यासह सर्व नगरसेवक तसेच माझी उपसभापती बंड्या मांजरेकर, शांतेश रावराणे, मारुती मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते . या सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन रावराणे यांचे अभिनंदन केले.
प्रदीप रावराणे यांच्या नावाची घोषणा होताच भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार अतिशबारी केली. तसेच ढोल- ताशाच्या गजरात आनंद साजरा करण्यात आला. निवडीनंतर रावराणे यांनी दत्त मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले.

