*कोंकण एक्सप्रेस*
*नवीन कुर्ली प्राथमिक शाळा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा*
*फोडाघाट _-प्रतिनिधि*
नवीन कुर्ली प्राथमिक शाळेत सालाबादप्रमाणे या ही वर्षी जागतिक महिला दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या त्यानंतर महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी फनी गेम्स , हळदीकुंकू असा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित दळवी, नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते, नवदुर्गा युवा मंडळाचे अध्यक्ष अरुण पिळणकर, कृष्णा परब, विजय कोलते, सखाराम हुंबे, मुख्याध्यापक जोशी मॅडम, पोलीस पाटील मृणाली चव्हाण, सर्व शिक्षक वृंद, पालक ,ग्रामस्थ तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रियांका शिर्के मॅडम, प्रस्थावना रेणुका जोशी मॅडम यांनी केली, महिलांसाठी स्पॉट गेम सेलिना पिंटो मॅडम यांनी घेतले तर आभार शिल्पा पवार मॅडम यांनी मानले.