मिठमुंबरी ग्रामपंचायतीत महिलादिन उत्साहात साजरा

मिठमुंबरी ग्रामपंचायतीत महिलादिन उत्साहात साजरा

*कोंकण एक्सप्रेस*

*मिठमुंबरी ग्रामपंचायतीत महिलादिन उत्साहात साजरा*

*सांस्कृतिक कार्यक्रमांतून महिलांनी दाखवला सहभाग*

*शिरगाव : संतोष साळसकर*

जागतिक महिलादिनानिमित्त ग्रामपंचायत देवगड तालुक्यातील मिठमुंबरी येथे विविध उपक्रमांचे आयोजन करून महिलांनी उत्साहात हा दिवस साजरा केला. ग्रामपंचायत कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस कु. सखुबाई देऊ गावकर हिच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी सरपंच बाळकृष्ण गावकर यांनी महिलादिनाचे महत्त्व विशद करत महिलांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. उपस्थित महिलांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यानंतर महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गीत, नृत्य तसेच पारंपरिक खेळांमधून महिलांनी आपली कला सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.
या कार्यक्रमास सरपंच बाळकृष्ण गावकर, उपसरपंच गुरुनाथ गावकर, ग्रामपंचायत सदस्य सरीता वाघट, अश्मिरा गावकर, ग्रामसेवक श्रीमती आर.एस. गोवळकर, अंगणवाडी सेविका, महिला ग्रामसंघ, महिला बचतगट सदस्य तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!