*किवींवर दणदणीत विजय मिळवंत टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वर मोठ्या दिमाखात आपले नावं कोरले…*

*किवींवर दणदणीत विजय मिळवंत टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वर मोठ्या दिमाखात आपले नावं कोरले…*

*कोंकण एक्सप्रेस*

*किवींवर दणदणीत विजय मिळवंत टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वर मोठ्या दिमाखात आपले नावं कोरले…*

*तमाम देशवासीयांचे मनःपूर्वक अभिनंदन…*

न्यूझीलंड क्रिकेट संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांची अचूक गोलंदाजी आणि उत्तम क्षेत्ररक्षण याच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा डाव २५१ धावांवर रोखला.

२५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत भारतीय फलंदाजांनी नेत्रदीपक फलंदाजीचे प्रदर्शन करत किवी गोलंदाजांची यथेच्छ पिटाई केली. स्वतः पुढाकार घेत रोहित शर्माने कप्तानी खेळी खेळत स्फोटक अर्धशतक ठोकले. शुभमन गिल, श्रेयस अय्यर, के.एल.राहुल, अक्षर पटेल तसेच सर्वच फलंदाजांनी कर्णधाराला साजेशी साथ दिली. अटीतटीच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड क्रिकेट संघाचा दणदणीत पराभव करत विजयश्री खेचून आणली. टीम इंडियाच्या या देदीप्यमान यशाचा प्रत्येक भारतीय नागरिकाला नक्कीच सार्थ अभिमान आहे. तमाम देशवासीयांचे तसेच भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन. भारतीय क्रिकेट संघाला भावी क्रिकेटसाठी हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!