कोंकण एक्सप्रेस
आमदार दीपक भाई केसरकर विज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
दोडामार्ग /शुभम गवस
दीपक भाई केसरकर विज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात पार पडला.
यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या कनिष्ठ लिपिका प्रतीक्षा बागडी लाभले.
गीता मेंस्त्री यांनी महिला विषयक मनोगत व्यक्त केले. तसेच महाविद्यालय प्रतिनिधी सीमंथिनी नाईक यांनीही आपल्या भाषाशैलीत महिला बद्दल मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालक सोनम सुतार यांनी केले
तसेच आभार प्रदर्शन प्रज्ञा नाईक यांनी केले.
या कार्यक्रमास किरण तोरस्कर, प्रतीक्षा ऐनापुरकर, गीता मेस्त्री, प्रतीक्षा बागडी, प्रज्ञा नाईक, सोनम सुतार,
ग्रंथालय विभाग प्रमुख बी .व्ही राशीवडे, प्रा .एम एस पाटील , प्रा.एन एम चौगुले, प्रा.एस आर नाईक, तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.