शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्निल चंद्रकांत धुरी यांनी आपला युवा सेना जिल्हा चिटणीस पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा  दिला  राजीनामा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्निल चंद्रकांत धुरी यांनी आपला युवा सेना जिल्हा चिटणीस पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा  दिला  राजीनामा

कोंकण एक्सप्रेस 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्निल चंद्रकांत धुरी यांनी आपला युवा सेना जिल्हा चिटणीस पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा  दिला  राजीनामा

वैभववाडी प्रतिनिधी  : संजय शेळके 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्निल चंद्रकांत धुरी यांनी आपला युवा सेना जिल्हा चिटणीस पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. राज्य प्रमाणे वैभववाडीतील उबाठा सेनेतील आउट गोइंग सुरूच आहे. त्यामुळे उबाटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
धुरी यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, मागील लोकसभा व विधानसभा या निवडणुकीच्या दरम्यान पक्षाचा झालेल्या पराभवानंतर पक्षाला आलेली मरगळ झटकण्यास अथवा दूर करण्यास पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील पदाधिकारी यांच्यासह सर्वच पदाधिकारी अपयशी ठरत आहेत. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्ते व पदाधिकारी हे पूर्णतः संभ्रमावस्थेत वावरत आहेत. या सगळ्याबद्दल वेळोवेळी वरिष्ठ पदाधिकारी वर्गाबरोबर चर्चा करून देखील त्याबाबत कोणतीही ठोस भूमिका या कार्यकर्त्यांची दखल वरिष्ठ पातळीवरून घेतली जात नाही. त्यामुळे या सर्व नैराश्यातून त्यांनी जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!