आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली मतदारसंघात तीन रुग्णवाहिका

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली मतदारसंघात तीन रुग्णवाहिका

*कोकण Express*

*आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली मतदारसंघात तीन रुग्णवाहिका*

18 मार्च रोजी माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकार्पण*

​*कणकवली ः प्रतिनिध*आमदार नितेशजी राणे यांच्या आमदार निधीमधून मतदारसंघातील उपजिल्हा रूग्णालय कणकवली , ग्रामिण रूग्णालय देवगड व ग्रामिण रूग्णालय वैभववाडी या रूग्णालयांना ३ नविन अँबुलन्स देण्यात येणार आहेत . या रूग्णालयांना अनेकवेळा दिलेल्या भेटीच्यावेळी अँबुलन्स अभावी होणारी रूग्णांची गैरसोय आरोग्य यंत्रणेकडून लक्षात आणून दिली जात असे , त्यामुळे शासनाच्या भरवशावर न राहता आपल्या “ आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत ” सुमारे १७ लाख रूपये किंमतीच्या ३ वातानुकुलीत रूग्णवाहीका देण्यास प्रस्ताव दिला व आता सदर रूग्णवाहीकाचे लोकार्पण दिनांक १८ मार्च रोजी माजी खासदार निलेश राणे  यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार  नितेशजी राणे यांचे हस्ते उपजिल्हा रूग्णालय कणकवली येथे होत आहे . कणकवली – देवगड – वैभववाडी हा डोंगराळ मतदारसंघ असल्याने व रूग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे तसेच पुढील उपचारांसाठी जिल्हा रूग्णालयामध्ये पाठविणे मध्ये अडचणी निर्माण होत होते . काही प्रसंगी उशिर झाल्याने रुग्णांच्या जिवावर बेतले जात होते. याची दखल घेऊन आमदार नितेशजी राणे यांनी मतदारसंघातील ३ मुख्य रूग्णालयांना रुग्णवाहीका मंजूर करून दिल्याने जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे​. ​ यापुढे मतदारसंघातील १५ प्राथमिक आरोग्य केंद्रांनासुद्धा लवकरच रूग्णवाहीकांची सोय उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!