शयनयान बसेस सिंधुदुर्ग विभागाकडे वर्ग होणार

शयनयान बसेस सिंधुदुर्ग विभागाकडे वर्ग होणार

*कोंकण एक्सप्रेस*

*शयनयान बसेस सिंधुदुर्ग विभागाकडे वर्ग होणार*

*कामगार सेनेच्या आंदोलनाला यश*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्गचे तत्कालीन विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांनी लांब पल्ल्ल्याच्या शयनयान गाड्या आपण

चालवण्यास सक्षम नसल्याबाबत पत्र दिल्यानंतर सिंधुदुर्ग विभागाकडील दोन साध्या शयनयान बसेस कोल्हापूर विभागाकडे सहा महिन्यापूर्वी वर्ग करण्यात आल्या होत्या. मात्र, आता कोल्हापूर विभागाकडील या दौन साध्या शयनयान बसेस सिंधुदुर्ग रा. प. विभागास कायमस्वरुपी वर्ग करण्याबाबत प्रादेश व्यवस्थापक मुंबई प्रदेश यांनी पुणे प्रादेशिक व्यवस्थापकांना कळवले आहे. या संदर्भात कामगार सेना सिंधुदुर्ग तसेच ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी या बसेस पुन्हा सिंधुदुर्ग विभागात वर्ग करण्याची मागणी करत धरणे आंदोलन केले होते. या मागणीला यश मिळल्याची माहिती एसटी कामगार सेनेचे विभागीय सचिव भगवान उर्फ आबा पुरी यांनी यांनी दिली.

आक्टोबर 2024 मध्ये ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी तत्कालीन विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्या कारभाराविरोधात धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी विविध मागण्यांचे पत्र एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकांना दिले होते. यामध्ये सिंधुदुर्ग विभागाकडील कोल्हापूर विभागाकडे वर्ग केलेल्या गाड्या पुन्हा सिंधुदुर्ग विभागाकडे वर्ग करण्याची मागणी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!