*कोंकण एक्सप्रेस*
*मारहाणप्रकरणी भावावर गुन्हा दाखल*
* कणकवली ः प्रतिनिधी*
क्षुल्लक कारणांवरून सख्ख्या भावाला बांबूच्या दांड्याने मारहाण करणाऱ्या रिचर्ड इतरू फर्नाडिस (30, रा. सांगवे-घोसाळवाडी) याच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मारहाणाची घटना बुधवार सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक वृत्त असे की, जॉन्सन फर्नाडिस व रिचर्ड फर्नाडिस हे सख्ये भाऊ एकाच घरात वेगवेगळे राहतात. बुधवारी सकाळी जॉन्सन च रिचर्ड यांच्यात क्षुल्लक कारणांवरून वाद झाला, या रागातून जॉन्सन याने रिचर्ड यांना बांबूच्या दांड्याने मारहाण केली. यात रिचर्ड यांच्या डोक्याला दुखापत झाली. याप्रकरणी रिर्चड यांनी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार जॉन्सन फर्नाडिस याच्याविरोधात भारतीय न्याव संहिता कलम 118 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस नाईक दिगंबर घाडीगावकर करीत आहेत.

