*कोंकण एक्सप्रेस*
*गाबीत समाज महाराष्ट्र संस्थेतर्फे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री मां.संजयजी शिरसाट यांचेकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर…..*
गाबीत समाज मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज दिनांक २५/०२/२०२५ रोजी सन्माननीय श्री संजयजी शिरसाट साहेबांची भेट घेऊन समाजाची खालील निवेदने देण्यात आली १)गाबीत या जातीचा अनुसूचित जमाती या प्रवर्गात समाविष्ट करण्याबाबत
२) गाबीत समाजाला आरक्षणाचा फायदा मिळविण्यासाठीच्या तरतूदी बाबत
३)शासन निर्णयानुसार गाबीत समाजाला दाखले मिळने बाबत
४)गाबीत समाज महामंडळ होणे बाबत
या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री सुजय धुरत, संस्थेचे सरचिटणीस गणपत (बाळ) मणचेकर, संस्थेचे खजिनदार श्री प्रवीण सरवणकर, विकास कुबल इत्यादी मंडळी उपस्थित होती

