फोंडाघाट महाविद्यालयात कॉमर्स विभागाची प्रश्नमंजुषा संपन्न

फोंडाघाट महाविद्यालयात कॉमर्स विभागाची प्रश्नमंजुषा संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*फोंडाघाट महाविद्यालयात कॉमर्स विभागाची प्रश्नमंजुषा संपन्न*

*फोंडाघाट : प्रतिनिधी*

येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मध्ये कॉमर्स विषयाची प्रश्नमंजुषा संपन्न झाली. इकॉनॉमिक्स,अकाउंटन्सी, टॅक्सेशन, कॉमर्स, लॉ व मॅनेजमेंट या सहा गटात स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यात अमोल तेली, स्वप्नील सावंत, काशी सावंत, कोमल जोईल, रीना चौगुले, अर्पिता सुद, पूजा सावंत, अमृता चव्हाण, सुहानी परब, पुष्पा घाडी, दयेश मेजारी, देवदीप परब हे विद्यार्थी सहभागी झाले होते.

एकूण पाच फेऱ्यांच्या घेतलेल्या स्पर्धेत लॉ गटाने सर्वाधिक प्रश्नांची उत्तरे देऊन प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय क्रमांक कॉमर्स गटाने तर तृतीय क्रमांक इकॉनॉमिक्स गटाने पटकावला.

या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना प्राचार्य डॉ. पुरंधर नारे म्हणाले की स्पर्धा आणि स्पर्धेची तयारी ही चेहऱ्याच्या हास्यातून दिसते. कोणताही कार्यक्रम विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन संपन्न केला पाहिजे. त्यातूनच आपले व्यक्तिमत्त्व फुलले जाते आणि स्पर्धेच्या युगात आपण टिकू शकतो. असे प्रतिपादन केले.

डॉ. बाजीराव डफळे म्हणाले की अभ्यासात्मक मूल्यांकन अशा उपक्रमातून होत असते. विद्यार्थ्यांचां आत्मविश्वास वाढवणे हे या मागील उद्देश आहे. महाविद्यालयीन जीवनात हा आत्मविश्वास वाढला तर पुढच्या आयुष्यात त्याचा उपयोग होतो.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कीर्ती पाटील यांनी केले. परीक्षक म्हणून प्रा. विनोद पाटील व प्रा. रूपाली पाटील यांनी काम पाहिले व सूत्रसंचालन प्रसाद लाड व ओमकार गुरव यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. संजय पाटील यांनी मानले कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!