*कोंकण एक्सप्रेस*
*छ.संभाजी नगरात कणकवलीतील तनश्रीला माॅसाहेब जिजाऊ स्वाभिमानी पुरस्कार*
*कणकवली : प्रतिनिधी*
छत्रपती संभाजी नगर येथील बुलंद छावा प्रणित राजमाता जिजाऊ जयंती महोत्सव समितीच्यावतीने देण्यात येणार्या “माॅ साहेब जिजाऊ स्वाभिमानी महिला पुरस्कार” कणकवलीतील पुर्वाश्रमीच्या तनश्री गणपत चव्हाण तथा तनश्री संतोष गायकवाड यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
छत्रपती संभाजी नगरातील एकूण ५ महिलांना हा पुरस्कार देण्यात आला. पैकी तनश्री गायकवाड या पतीच्या नोकरीनिमित्त या शहरात स्थायिक झालेली पर जिल्यातील महिला आहे. कणकवली प्रमाणे तिने छत्रपती संभाजी नगरात सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत राहून आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. तनश्रीचे सासर हे गडहिंग्लज असून माहेर कणकवली आहे. तनश्री या कणकवलीतील ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते गणपत तथा भाई चव्हाण यांच्या कन्या आहेत.
या पुरस्काराचे वितरण समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे-जाधव, डाॅ. वृषाली देशमुख आदींच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी वन विभागाचे सेवा निवृत अधिकारी ॲड. सुरेखा देशमुख, शिव व्याख्याते प्रा. डॉ. सुभाष बाग, बुलंद छावाच्या उत्सव समितीच्या अध्यक्षा डॉ. दिव्या पाटील, कार्याध्यक्ष अनिता म्हस्के, स्वागताध्यक्ष सुनिल निकम, सरचिटणीस सुमन बोर्डे, संस्थापक सचिव सुरेश वाकडे, प्रा. रविंद्र निळ, विलास पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राजमाता यांच्या जीवन चरित्रावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

