कणकवलीत सोमवार 10 फेब्रुवारीला विश्वकर्मा जयंती उत्सव कार्यक्रम

कणकवलीत सोमवार 10 फेब्रुवारीला विश्वकर्मा जयंती उत्सव कार्यक्रम

कोंकण एक्सप्रेस 

कणकवलीत सोमवार 10 फेब्रुवारीला विश्वकर्मा जयंती उत्सव कार्यक्रम

कणकवली / प्रतिनिधी

कणकवली शहरातील सुतारवाडी येथील समाज बांधवांच्यावतीने सोमवार 10 फेब्रुवारी रोजी विश्वकर्मा जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये सकाळी 10 वा. पासून मूर्तीचे वाजत गाजत आगमन, अभिषेक, आरती, तीर्थप्रसाद दुपारी 1 वाजता महाप्रसाद, 3 वाजल्यापासून हळदीकुंकू रेकॉर्ड डान्स स्पर्धा, स्थानिक भजने, रात्री 9.30 वाजता उभादांडा- वेंगुर्ला येथील पार्सेकर यांचे महान पौराणिक दशावतारी नाटक सादर होणार आहे. तरी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कणकवली मधलीवाडी (सुतारवाडी) येथील विश्वकर्मा जयंती उत्सव मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!