*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत पासवर्ड वाचन अभियान*
*कणकवली : प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थयासाठी पासवर्ड वाचन अभियान पुणे या संस्थेच्या माध्यमातून प्रशालेत वाचन अभियान मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. मानणीय श्री प्रसाद घाणेकर साहेब यांनी पासवर्ड वाचन अभियान या संस्थेशी संपर्क साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडक शाळांतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे सौ वृषाली जोगळेकर मॅडम आणि वाचन संस्कार केंद्रातील त्यांचे सर्व सहकारी वर्षभर हा उपक्रम सारस्वत बँकेच्या सहकार्यातून राबविण्यात येणार आहे.
विद्यार्थांना वाचनासाठी पासवर्ड विविध पुस्तके उपलब्ध करून देणार आहेत आणि वाचलेल्या प्रत्येक पुस्तकांवर वाचन स्पर्धा घेऊन वाचन संस्काराचा एक अभिनव उपक्रम हाती घेतलेला आहे. या उपक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेरमन डॉ. राजश्री साळुंके मॅडम यांनी प्रोत्साहन दिले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी वाचन संस्कृती रुजण्यासाठी विविध ग्रंथाविषयी माहिती विद्यार्थांना देण्यात आली. पर्यवेक्षक श्री अच्यूतराव वणवे सरांनी शुभेच्छा दिल्या.
प्रशालेचा मराठी विभागाने या उपक्रमाचे नेटके आयोजन करून विद्यार्थ्यांना वाचना कडे आकर्षित केले श्री संदिप कदम सर सौ पी पी सावंत मॅडम सौ शिरसाठ मॅडम श्रीम कदम आर आर मॅडम यांनी सहकार्य करून वाचन अभियान यशस्वी केले.

