*कोकण Express*
*कलमठ येथे गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साध्या पद्धतीने होणार*
*५ मार्च रोजी होतो हा सोहळा, कोरोनाच्या संकटामुळे कार्यक्रमात बदल*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील कलमठ येथे श्री गजानन महाराज सेवाश्रमाच्या वतीने शुक्रवार ५ मार्च रोजी होणारा श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा कोरोना महामारी मुळे साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. या प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्ताने धार्मिक विधी पार पाडण्यात येणार आहेत. मात्र दुपारचा महाप्रसाद व झुणका भाकरीचा प्रसाद होणार नसल्याचे सेवा आश्रमाच्या वतीने सांगण्यात आले.