प्राजक्ता बांदेकर यांच्या निवडीने शिवसेनेचा कुडाळात जल्लोष

प्राजक्ता बांदेकर यांच्या निवडीने शिवसेनेचा कुडाळात जल्लोष

*कोंकण एक्सप्रेस*

*प्राजक्ता बांदेकर यांच्या निवडीने शिवसेनेचा कुडाळात जल्लोष*

*कुडाळ : प्रतिनिधी*

कुडाळच्या नगराध्यक्षपदी प्राजक्ता बांदेकर यांची निवड जाहीर होताच शिवसेना आणि महायुतीच्या गोटात जोरदार जल्लोष व्यक्त करण्यात आला. आमदार निलेश राणे यांचा जयजयकार करणाऱ्या घोषणांनी कुडाळ गांधी चौक परिसर दणाणून गेला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा करण्यात करण्यात आली.

कुडाळच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी कुडाळ पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. नगर पंचायत परिसरात मनाई आदेश होता. गांधीचौकातून बाजारपेठेत येताना बॅरिकेट्स लावण्यात आली होती. त्यामुळे शिवसेना आणि महायुतीचे सर्व सर्व कार्यकर्ते गांधीचौकात गोळा झाले होते. प्राजक्ता बांदेकर यांची निवड जाहीर होताच एकच जल्लोष करण्यात आला फटाक्यांची आतिश बाजी करण्यात आली खासदार नारायण राणे आणि आमदार निलेश राणे यांची मोठी पोस्टर्स घेऊन सर्व कार्यकत्यांनी जल्लोष केला.

प्राजक्ता बांदेकर सुद्धा निवडून आल्यावर नगरपंचायत कार्यालयातून बाहेर पडून त्या काही अंतरावर गांधी चौकात थांबलेल्या आपल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी चालत गेल्या. त्यावेळी वाटेत नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले. प्राजक्ता बांदेकर कार्यकर्त्यांच्या गराड्यात पोहोचताच पुन्हा एकदा घोषणा देण्यात आल्या. यावेळी आमदार निलेश राणेंचे देखील आगमन झाले. शिवसेना झिंदाबाद, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, निलेश राणे तुम आज बढ़ो या घोषणांनी आणि फटाक्यांच्या अतिशबाजीने आसमंत दणाणून गेला. आमदार निलेश राणे यांनी देखील माध्यमांना सामोरे जाताना पारदर्शक कारभाराची अपेक्षा प्राजक्ता बांदेकर यांच्याकडून व्यक्त केली.

यावेळी सिद्धिविनायक पॅनलचे सर्व नगरसेवक, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसेनेचे संजय आंग्रे,, जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, महिला आघाडी जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर आदीनी प्राजक्ता बांदेकर यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!