“द नेक्स्ट स्टार ” या टीव्ही रिएलटी शो ची विजेती कुडाळची सुमन चव्हाण 

“द नेक्स्ट स्टार ” या टीव्ही रिएलटी शो ची विजेती कुडाळची सुमन चव्हाण 

*कोंकण एक्सप्रेस*

*”द नेक्स्ट स्टार ” या टीव्ही रिएलटी शो ची विजेती कुडाळची सुमन चव्हाण*

*कुडाळ : प्रतिनिधी*

कुडाळ मधील कुमारी सुमन चव्हाण ही मुलगी “द नेक्स्ट स्टार ” या टीव्ही रिएलटी शो ची विजेती ठरली आहे.ही मुलगी कुडाळ शहरातील पि.के.डान्स क्रु आणि फिटनेस स्टुडिओ कुडाळ येथे शिकत आहे.याचे संस्थापक प्रसाद कमतनुरे असुन या डान्स क्लासची पाच मुलींची टीव्ही शो साठी निवड करण्यात आली होती.हा टीव्ही शो दिल्ली येथील मुरादाबाद शहरात झाला.या शोचे (शूट) सादरीकरण करण्यात आले.या शोमधील पहिल्या फेरीतील टीव्ही शोमध्ये पि.के.डान्स फिटनेस स्टुडिओ ची कुडाळ मधील पाच मुले ही टीव्ही राउंड वरून सेमी फायनल साठी निवड करण्यात आली.त्यानंतर पुढच्या सेमी फायनल राऊंड हा बॅटल मध्ये राउंड घेण्यात आला.यामध्ये तिथून पुढे पि.के.डान्स फिटनेस स्टुडिओ ची सर्व मुले ग्रँड फिनाले साठी निवड करण्यात आली आणि यातूनच पुढील ग्रँड फिनाले मध्ये सुमन चव्हाण ही ” द नेक्स्ट स्टार “या टीव्ही रिएलटी शो ची विजेता ठरली आहे.तसेच कनका परुळेकर ,श्रुतिका परब जानवी पावसकर व चैत्रा चव्हाण या शोच्या ग्रँड फायनल टॉप १५ मध्ये आपलं नाव गाजवलं आहे

द नेक्स्ट स्टार या टीव्ही रिएलटी शो ची विजेता ठरलेली कु.सुमन चव्हाण ही मुलगी कुडाळ येथील पि.के. डान्स कु आणि फिटनेस स्टुडिओ कुडाळ या डान्स क्लास मध्ये शिकत आहे त्याचे गुरु प्रसाद कमतनुरे आहेत.अधिक माहितीसाठी ७०३८ २९५२७६ या नंबरवर संपर्क करा.तसेच हा शो तुम्हाला टेलिव्हिजनच्या  ईश्वर चॅनल वरती पहायला मिळणार आहे.त्यामुळे कुडाळ मधून सर्वच स्तरातून या सर्व मुलींचे कौतुक होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!