*कोंकण एक्सप्रेस*
*राष्ट्रवादी (श.प.) गटाचे ओबीसी तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर यांचा राजीनामा*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश काशिनाथ तेंडोलकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांना सुपूर्द केला आहे. आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्रादेशिक सदस्यत्वाचा आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.तसेच पक्षाने पद देऊन सामाजिक कार्य करण्याची संधी दिली त्याबद्दल आपण पक्षाचा सदैव ऋणी असेन,असेही त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.
याबाबत सिद्धेश तेंडोलकर यांच्याशी संपर्क साधला असता वैयक्तिक कारणास्तव आपण पक्षाचा व पदाचा राजीनामा देत असून आपली पुढील भूमिका लवकरच जाहीर करेन असे त्यांनी म्हटले आहे.

