हडी येथील ग्रामसंवाद कार्यक्रमास ग्रामस्थांचा प्रतिसाद !

हडी येथील ग्रामसंवाद कार्यक्रमास ग्रामस्थांचा प्रतिसाद !

*कोंकण एक्सप्रेस*

*हडी येथील ग्रामसंवाद कार्यक्रमास ग्रामस्थांचा प्रतिसाद !

*मालवण : प्रतिनिधी*

ग्रामपंचायत हडी येथे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून ग्रामसंवाद कार्यक्रमाचे आयोजन मालवण पोलीस ठाणे यांच्यामार्फत करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमास मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कोल्हे, सरपंच प्रकाश तोंडवळकर, ग्रामसेवक श्री चौरे, पोलीस कर्मचारी कैलास ढोले उपस्थित होते. ग्रामसेवक श्री चौरे यांनी प्रस्ताविक केले. तर स्वागत सरपंच प्रकाश तोंडवळकर यांनी केले.

यावेळी ग्रामस्थांन सोबत विविध समस्यावर चर्चा करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी सायबर गुन्ह्या संदर्भात ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ग्रामस्थांच्या समस्या त्या त्या विभागापर्यंत पोहोचवून त्यावर योग्य तो मार्ग काढण्यात येईल असे आश्वासित केले. उपसरपंच भरत लाड तंटामुक्ती अध्यक्ष जानू कदम, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष देविदास सुर्वे, उपाध्यक्ष आरती कदम, चंद्रकांत पाटकर, प्रभाकर तोंडवळकर, सुभाष वेंगुर्लेकर, महेश सुर्वे, महादेव सुर्वे, भाई मुणगेकर, राजेश शेडगे, किशोर नरे, नागेश कावले, अभय गावकर, पोलीस पाटील दिनेश सुर्वे, श्रीधर गोलतकर, तृप्ती हडकर, जान्हवी पांजरी आदीसह ग्रामस्थ, जेष्ठ नागरिक कर्मचारी उपस्थित होते. आभार सरपंच प्रकाश तोंडवळकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!