राष्ट्रीय शालेय साॅफ्टबाॅल स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक

राष्ट्रीय शालेय साॅफ्टबाॅल स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक

*कोंकण एक्स्प्रेस*

*राष्ट्रीय शालेय साॅफ्टबाॅल स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक….*

*दोडामार्ग तालुक्यातील भूमी सावंत हिची उत्कृष्ट कामगिरी …*

*दोडामार्ग : शुभम गवस*

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय जळगांव आयोजित ६८ व्या शालेय राष्ट्रीय साॅफ्टबाॅल स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या १७ वर्षाखालील मुलीच्या संघाने सुवर्णपदक मिळविले.
या संघातून खेळताना न्यू इंग्लिश स्कूल भेडशी ता.दोडामार्ग जि.सिंधुदुर्ग प्रशालेची खेळाडू कु.भूमी हनुमंत सावंत हिने उत्कृष्ट कामगिरी केली
भूमीला पुढिल वर्षी दहावी परिक्षेसाठी ४% (२० गुण) व स्पर्धा परिक्षा (MPSC/UPSC) साठी खेळाडू कोट्यातून ५% आरक्षण लागू झाले.
सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा प्रशासन यांचेकडून कु.भूमी हनुमंत सावंत हिचे अभिनंदन करण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!