मणचे गावचे सरपंच उपसरपंच शिवसेनेत, आमदार निलेश राणे यांनी केले स्वागत

मणचे गावचे सरपंच उपसरपंच शिवसेनेत, आमदार निलेश राणे यांनी केले स्वागत

*कोंकण एक्सप्रेस*

*मणचे गावचे सरपंच उपसरपंच शिवसेनेत, आमदार निलेश राणे यांनी केले स्वागत*

*देवगड ः प्रतिनिधी*

देवगड तालुक्यातील मणचे ग्रामपंचायत सरपंच दीपक जगन्नाथ तोरस्कर, उपसरपंच मन्सूर उस्मान सोलकर यांच्यासह ग्रा. पं. सदस्य व कार्यकर्त्यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार नीलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. दत्ता सामंत यांच्या मालवण कुंभारमाठ येथील निवासस्थानी शिवसेनेचे देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे उपस्थित होते. शिवसेना प्रवेशकर्त्यांमध्ये मणचे सरपंच, उपसरपंचांसह ग्रा. पं. सदस्य फैय्याज जैनुद्दीन पावसकर, विष्णू महादेव कोतवडेकर, सौ. सारिका रहाटे, सौ. सुप्रिया सुधाकर मणचेकर, सौ. उर्मिला स्वप्नील फाळके व कार्यकर्त्यांचा  समावेश आहे. यावेळी मणचे तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र पांचाळ, तेजस घाडी, प्रकाश रहाटे, राजा घोरपडे, रमाकांत तेली, चंद्रकांत गुरव, सुरेश घाडी, नीतेश पवार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!