*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या कुंभारमाठ येथे अभिष्टचिंतन सोहळा*
*मालवण : प्रतिनिधी*
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा ५६ वा वाढदिवस सोहळा उद्या मंगळवार दिनांक ७ जानेवारी रोजी त्यांच्या कुंभारमाठ येथील निवासस्थानी साजरा होत आहे.या कार्यक्रमाला शिवसेना,भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सोमवारी याठिकाणी भेट देऊन कार्यक्रम स्थळाची पाहणी केली.यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, आनंद शिरवलकर, मकरंद राणे, राजा गावडे, गणेश तोंडवळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

