हिंदू धर्म रक्षक म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडायला हवी -बंदरे व मत्स्यउद्योग मंत्री नितेश राणे

हिंदू धर्म रक्षक म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडायला हवी -बंदरे व मत्स्यउद्योग मंत्री नितेश राणे

*कोंकण एक्सप्रेस*

*हिंदू धर्म रक्षक म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडायला हवी -बंदरे व मत्स्यउद्योग मंत्री नितेश राणे*

*आंबोली येथे धर्म परिषदेमध्ये केले आवाहन*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

आंबोली कामतवाडी येथील स्वामी समर्थ मठ येथे तीन दिवसीय धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आज त्याचा दुसरा दिवस. या कार्यक्रमासाठी हिंदुत्व वादी नेते व मत्स्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे उपस्थित होते.त्यांचे स्वागत आंबोली पोलीस स्थानकाजवळ भाजप पदाधिकाऱ्यांनी केले.

सरपंच सावित्री पालेकर, सोसायटी अध्यक्ष शशिकांत गावडे, चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे, बाबू शेटवे, गेळे सरपंच सागर ढोकरे, माजी सभापती आत्माराम पालेकर, गुरुदास पेडणेकर, प्रकाश गावडे, संतोष पालेकर, दिलीप सावंत, नमिता राऊत, दिव्या सावंत, दीपक मेस्त्री, रूपा गावडे, अमरेश गावडे आदी नी स्वागत केले. याठिकाणी शशिकांत गावडे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर श्री राम मंदिर येथे शिंदे गटातर्फे ही पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले. यांनतर स्वामी समर्थ मठ येथे कार्यक्रम करण्यात आला.

हिंदू धर्म परिषद व्यासपीठावर मंत्री श्री नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, संचालक महेश सारंग, रवी मडगांवकर, श्वेता कोरगावकर, दिनेश गावडे, सरपंच सावित्री पालेकर, आत्माराम पालेकर, गुलाबराव गावडे, सागर ढोकरे, उप सरपंच दत्तू नार्वेकर, संतोष पालेकर, बाळा उर्फ प्रकाश गावडे, गुरु पेडणेकर, मेघा गांगण, अनंत गावडे, उल्हास गावडे आदी उपस्थित होते. या वेळी श्री जोशी महाराजांच्या हस्ते मंत्री नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मठाचे गुरु श्री परमानंद महाराज यांच्या हस्ते ही राणे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी नितेश राणे म्हणाले, स्वामी समर्थ तसेच अन्य मठामार्फत हिंदू चा प्रसार प्रचार होत आहे. जाणीव जागृतीचे काम निरंतर होत आहे हे कौतुकास्पद आहे. हिंदू म्हणून एकमेकास सहकार्य करण्यास पुढे आले पाहिजे. हिंदू धर्म रक्षक म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडायला हवी. कडवट पणा दाखवला पाहिजे. इस्लाम धर्म ज्या पद्धतीने धर्म अभिमान बाळगतो त्या नुसार हिंदू ने जागृत होण्याची आवश्यक्यता आहे. २०४७ ला इस्लामिक राष्ट्र घोषित करण्याचे मनसुभे, षडयंत्र , धर्मांतरन हे सर्व प्रकार हानून पाडले पाहिजेत. इतर धर्माप्रमाणे हिंदू ना सुध्दा न्याय असला पाहिजे. हिरवे झेंडे कोणतीही परवानगी न घेता लावले जातात मात्र भगव्यासाठी परवानगी हे चालणार नाही. भारत हे हिंदू राष्ट्र आहे. त्याचा अभिमान आणि दबदबा राहिला पाहिजे. आपण आयुष्य जगत असताना धर्माला प्राधान्य दिले पाहिजे. हिंदू साठी किती गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत याच मोजमाप झाल पाहिजे. हिंदू साठी बाजू घेणे हे कर्तव्य मानल पाहिजे. सर्व धर्म समभाव यावर बंदी आणायला हवी. हिंदुत्व हृदयात असले पाहिजे. असे प्रतिपादन नितेश राणे यांनी आंबोलीत केले. यावेळी मठाचे गुरु परमानंद महाराज यांनी मंत्री नितेश राणे यांना निवेदन दिले, त्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील देवस्थाने पश्चिम महाराष्ट्र समिती मध्ये येतात त्यामुळे इथल्या देवस्थानांचा विकास करण्यासाठी अडचणी येतात तसेच निधी मिळत नाही त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी साठी वेगळे मंडळ स्थापन करावे आणि निधी द्यावा असे परमानन्द् महाराज यांनी निवेदन दिले.त्यांच्याहस्ते सत्कार ही करण्यात आला. तर येथील स्वामी समर्थ मठात सुशोभीकरण करण्याची मागणी उल्हास गावडे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!