सिंधुदुर्गनगरीत ६ जानेवारीला पत्रकार दिन साजरा होणार

सिंधुदुर्गनगरीत ६ जानेवारीला पत्रकार दिन साजरा होणार

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्गनगरीत ६ जानेवारीला पत्रकार दिन साजरा होणार*

*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्र ६ जानेवारीला सुरू केले.यानिमित्ताने साजरा होणारा पत्रकार दिनाचा कार्यक्रम सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनात आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला राज्याचे मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी केले आहे.

सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भवनात अत्याधुनिक सुविधा असाव्यात यासाठी मंत्री नितेश राणे यांनी सूचना केल्या होत्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्रकार भवनातील आवश्यक कामे हाती घेतली आहेत. मिनी सभागृह हायटेक प्रणाली बसविण्यात येत आहे. एलसीडी प्रोजेक्टर, साऊंड सिस्टिम, टीव्ही युनिट, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आदी सुविधा सुरू होत असून याचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय पुतळा सजावट पूर्ण होत आहे. या व्यतिरिक्त भवनातील लिफ्ट सुविधा, जनरेटर सुविधा, मुख्य सभागृहात एलसीडी प्रोजेक्टर, निवासी सूटमध्ये एसी सुविधा, बाळशास्त्री जांभेकर कलादालन, जिल्हा पत्रकार संघाचे कार्यालय अशी जवळपास पंधरा प्रकारची कामे घेण्यात आली आहेत. यासाठी सुमारे एक कोटीचा निधी आवश्यक असून आवश्यक असणारा सर्व खर्च करू अशी ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार संघाला दिली आहे.

पत्रकार दिनाच्या या मुख्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार व सन्मान होणार आहे. प्रतिनिधिक स्वरूपात पत्रकार संघाच्या ओळखपत्रांचे वितरण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!