*कोंकण एक्सप्रेस*
*६ जानेवारीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले-देवगड येथील स्मृती स्थळी अभिवादन कार्यक्रम*
*कासार्डे प्रतीनिधी ; संजय भोसले*
तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराच्या वतीने ६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता पत्रकार दिनानिमित्त मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले (देवगड, जि.सिंधुदूर्ग) येथील स्मारक स्थळी अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
याप्रसंगी आपल्या सर्वांच्या तसेच दळवी महाविद्यालयाच्या मास मिडिया विभागाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या उपस्थितीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल.
सर्व पत्रकारांनी सोमवार दिनांक ६ जानेवारी रोजी सकाळी ठीक ८.०० वाजता कासार्डे तिठ्ठा येथे एकत्रितपणे जमून पोंभुर्ले येथे जाण्यासाठी निघायचे आहे. तरी अभिवादन कार्यक्रमाला सर्वांनी वेळीच आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.