*कोंकण एक्सप्रेस*
*पुण्यातील सीआयडी ऑफीसमध्ये वाल्मिक कराडेचे आत्मसमर्पण*
*पुणे : प्रतिनिधी*
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडेचे नाव समोर आले. विरोधकांनी सातत्याने कराडवर टीका केली.कराडे हा मंत्री मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात आला होता.प्रकरण आणखीच तापल्यानंतर वाल्मिक कराडे गायब झाला होता.त्याचा कसून शोध घेतला जात होता.अखेर वाल्मिक कराडेने आज शरणागती पत्करली.
संतोष देशमुख आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली होती.तर तीन आरोपी फरार होते.या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून गेल्या 4 दिवसांपासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून
जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराडचे नाव घेतले जात आहे. सीआयडीने वाल्मिक कराडच्या भोवती तपासाचा फास आवळला. संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडेचे नाव घेऊन आरोप होऊ लागले होते. सीआयडीने आपल्या वाल्मिक कराडेच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी सुरु केली होती.
संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या 9 टीम कार्यरत आहेत. टीममध्ये सुमारे दीडशेहून अधिक सीआयडीचे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व टीमने सुमारे 100 हून अधिक लोकांची या प्रकरणांमध्ये आतापर्यंत चौकशी केली. वाल्मिक कराडेवर सीआयडीने आपला दबाव वाढवण्यास सुरुवात केली. या प्रकरणातील आरोपींचे बँक खाते गोठवण्यात आले. तर, संपत्ती जप्तीची कारवाई सुरु करण्यात आली.
वाल्मिक कराडे याला ताब्यात घेण्यासाठी CID जंगजंग पछाडत होती. 11 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडेवर खंडणीचा गुन्हा दाखल होता. त्यानंतरही वाल्मिक कराडे हा सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले. नागपूर हिवाळी अधिवेशनात नागपूरलाही वाल्मिक कराडेने काहीजणांना भेटीगाठी घेतल्या होत्या. तरीदेखील कराडेकडे कोणाचेही लक्ष गेले नाही.